Take a fresh look at your lifestyle.

ड्रायव्हिंग लायसन हरवलेय?

असे काढा डुप्लिकेटसाठी लायसन ऑनलाईन! 

जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन हरवले असेल तर आता नवे मिळविण्यासाठी लोकांना आरटीओमध्ये जायची गरज नाही. मोबाईलवर घर्णासल्या तुम्ही नवीन लायसन साठी अर्ज करू शकणार आहात.
डुप्लिकेट लायसन मिळविण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही ऑनलाईन/ ऑफलाईनद्वारे ते मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल. ते म्हणजे पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करावा लागेल. जर जुने लायसन तुमच्याकडे असेल आणि ते खराब झाले असेल तर ते जमा करावे लागेल आणि यानंतर डुप्लिकेटसाठी अर्ज करता येईल.
प्रक्रिया कशी आहे? :
▪️ सर्वप्रथम परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन मागितलेले तपशील भरा.
▪️ यानंतर, एलएलडी फॉर्म भरून प्रिंट काढा.
▪️ यानंतर तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
▪️ हा फॉर्म आणि सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करा किंवा तो भरून पुन्हा आरटीओच्या वेबसाईटवर अपलोड करा.
▪️ ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांनंतर डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.