Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या नगरसेवकाने केला मोठा खुलासा

ते तर म्हणतात...

पारनेर : नगरपंचायतमधील शिवसेनेचे सातही शिवसेनेबरोबरच आहेत. शिंदे गटाबरोबर जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. नगरसेवकांविषयी गेल्या तिन चार दिवसांपासून येत असलेल्या बातम्या या निराधार असल्याचे नगरसेवक युवराज पठारे यांनी ‘पारनेर दर्शन’शी बोलताना सांगितले.
पठारे म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी आम्हा नगरसेवकांशी संपर्क करून शिंदे गटासोबत जाण्याबाबत गळ घातली होती. त्यांनी अनेकदा भेट घेऊन शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला नेण्याचेही प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते आहे, त्यांच्याकडून प्रभागासाठी मोठा निधी आणला येईल असेही सांगण्यात आले होते. मात्र सर्व नगरसेवकांनी एकमताने निर्णय घेऊन आपण उध्दव ठाकरे, विजयराव औटी यांच्यासोबत ठामपणे राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. रोहोकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भिमाशंकर दौऱ्यादरम्यान शनिवारी लांडेवाडी येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी एकही नगरसेवक त्यांच्यासमवेत नव्हता. सोमवारी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळीही कोणीही त्यांच्या समवेत नव्हते. रोहोकले यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आम्हाला गळ घातली होती, तेवढाच काय त्यांचा आणि आमचा संबंध असल्याचे पठारे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आम्ही निवडूण आलेलो आहोत. त्यामुळे पक्षाला सोडून जाण्याचा प्रश्‍नच येणार नाही. आम्ही सर्व नगरसेवक एक असून कोणीही विकास रोहोकले यांच्या मागे शिंदे गटात जाणार नाही. जो काही निर्णय होईल तो सर्व नगरसेवक एकत्र बसूनच घेतात असेही पठारे यांनी सांगितले.