Take a fresh look at your lifestyle.

कमालच झाली राव… नगरमधील ‘या’ गावाला सरपंचच नाही !

दोन्हीही पदे रिक्ततच .. जाणून घ्या कारण

नगर : तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भातोडी गावची ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडल्यानंतर मंगळवारी ( २३ ऑगस्ट ) रोजी सरपंच – उपसरपंच पदाची निवडणूक होती, मात्र सरपंच पदासाठी ओबीसी आरक्षण असल्याने या जागेसाठी एकही उमेदवार या जागेवर निवडून न आल्याने ही जागा रिक्तच राहिली आहे, पण उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
उपसरपंच पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.आणि त्यांनीही अर्ज माघारीचा वेळ संपण्याआधीच दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उपसरपंच पदाचीची सुध्दा जागा रिक्तच राहिली.
यामुळे आता दोन्ही जागा रिक्त असून गावाला अजून सहा महिने प्रशासकच राहणार आहे. यामुळे गावात नाराजीचे वातावरण असून गावाचा विकास होत नसल्याची चर्चा आहे. दीड वर्षापासून या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती आहे. याचा परिणाम गावाच्या विकास कामांवर होत आहे . गावचे सरपंच आणि उपसरपंच ही दोन्ही पदे रिक्त असणारे भातोडी हे एकमेव गाव असल्याची चर्चा रंगत आहे.