Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचा दणका

'ही' याचिकाही फेटाळली

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.शिवसेनेतील बंडखोर 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसह 5 याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. दुसरीकडे या खटल्यावर सतत ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. त्यामुळे ठाकरे गट अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.
सुप्रीम कोर्टात आधी 8 ऑगस्टला होणारी सुनावणी 12 ऑगस्टवर गेली.. त्यानंतर पुन्हा ही सुनावणी 22 ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली.दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तसे पुरावेही सादर केले आहेत.
▪️ठाकरे गटाची याचिका फेटाळली
शिवसेना पक्ष व पक्षचिन्हावर कुणाचा हक्क असेल, याचा निर्णय येत्या 19 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोग घेणार असल्याचे समजते.ही बाब लक्षात आल्यावर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
शिंदे गटाविरोधात दाखल याचिकांवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तशी याचिका ठाकरे गटातर्फे सुप्रीम कोर्टात ‘मेन्शन’ करण्यात आली. शिवसेनेच्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी या याचिकेत केली होती..
दरम्यान, ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे.. ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. हा खटला घटनापीठासमोर चालवायचा की नाही, यासंदर्भातीलच निकाल होणे बाकी आहे. तसेच याबाबत निकाल आम्हाला देणे आवश्यक असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी सांगितले..