Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसच्या ‘या’ निष्ठावान नेत्याचे निधन !

शेवटच्या श्वासापर्यंत जपली पक्षनिष्ठा.

 

 

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गट नेते आमदार शरद रणपिसे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जोशी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
अलीकडील प्रॅक्टिकल राजकारणाच्या काळात पक्षाकडून एखाद्या उमेदवाराला जर तिकीट दिले नाही, तर संबंधित उमेदवार लगेचच दुसरा विचार करतात. आपल्या मतदारसंघाचं राजकारण, कार्यकर्ते या सगळ्याचा विचार करून उमेदवार निर्णय घेत असतात. मात्र याला काँग्रेसचे मागच्या ५ दशकांपासून निष्ठावंत असेलेले शरद रणपिसे अपवाद ठरले होते.
१९५१ साली जन्म झालेल्या शरद रणपिसे यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात रस होता. परिणामी ते अगदी ७० च्या दशकापासून म्हणजे अवघ्या २० व्या वर्षी काँग्रेस सोबत जोडले गेले. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केल्याने काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखलं जात होते.
रणपिसे यांना ऐनवेळी एकदा विधानसभेचे तिकीट नाकारले कारण विधानपरिषदेवर आमदार असलेले रणपिसे यांचे मिळालेले तिकीट अखेरच्या ३ दिवसात कापले गेले होते, मात्र तरीही त्यांनी आपला पक्ष सोडला नव्हता. पण या सगळ्या घडामोडीनंतर देखील रणपिसे यांनी वेगळा विचार केला नव्हता. ते म्हटल्याप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षासोबत राहिले. आज आमदार शरद रणपिसे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
▪️कोण होते शरद रणपिसे?
शरद रणपिसे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1951 रोजी पुण्यात झाला होता. पुण्यातच त्यांचे बालपण गेले. महाविद्यालयीन शिक्षण देखील त्यांनी पुण्यनगरीतच घेतले. पुढे महाविद्यालयीन जीवनातच त्यांना राजकारणाचं वेड लागले. पुढे काही काळातच त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.
बी कॉम पर्यंतचं त्यांचं शिक्षण झाले होतं. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा त्यांना अवगत होत्या. विधिमंडळात अभ्यासू आणि संयमी भाषण करण्यात ते तरबेज होते. विविध विषयांवर काँग्रेसची बाजू ते मांडायचे. विधिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना व्हायची.
महानगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून त्यांनी उत्तम काम पाहिलं.
▪️शरद रणपिसे यांनी भूषवलेली पदे
रामराज्य शिक्षण संस्था पुणे संस्थापक
उर्दू शिक्षण संस्था पुणे
काँग्रेस पक्षाचे सदस्य 1969
पुणे महापालिकेचे सदस्य 1979 ते 1985
गलिच्छवस्ती निर्मूलन, गृहनिर्माण व समाज कल्याण समितीचे अध्यक्ष 1983-1984
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ 1994-1995
पुणे शहर इंदिरा काँग्रेस पक्ष संस्थापक सदस्य 1978
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस 1973