Take a fresh look at your lifestyle.

पारनेरमध्ये मोफत चहा !

जाणून घ्या कारण

पारनेर : येथील आंबेडकर चौकातील ग्रज्युएट चहाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज (15 ऑगस्ट) शहरात चहाची मोफत वाटप करण्यात आली.
या संदर्भात माहिती देताना या हॉटेलचे संचालक धनंजय मासाळ म्हणाले की,आमच्या प्रिय ग्राहकांनी 5 महिन्यात खूप भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला त्याचबद्दल स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आम्ही चहाचे मोफत वाटप करून 15 ऑगस्टच्या खूप शुभेच्छा दिल्या.
पारनेरमध्ये आमचाच चहा नंबर 1 आहे . म्हणूनच 5 महिन्यात आम्ही खूप ग्राहक जोडले , असेच उपक्रम करून आम्ही देशाची सेवा करणार आहे . काही दिवसातच आम्ही ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देणार आहोत.