Take a fresh look at your lifestyle.

वीर माता पित्यांच्या हस्ते वडनेरला ध्वजवंदन

कन्हैय्या उद्योग समुहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

वडनेर हवेली : भारतीय स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त कन्हैया अॅग्रोच्या प्रांगणामध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहीद जवान अरुण कुटे यांच्या वीर माता सौभाग्यवती शांताबाई बबन कुटे व वीर पिता बबनराव कुटे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे या सर्व महात्म्यांच्या पावन स्मृतीला सर्वांनी वंदन केले. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिले, संघर्ष केला, आंदोलने केली त्याचप्रमाणे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सुद्धा आपले जवान सीमेवर लढत आहेत. त्यांचे देखील योगदान आपण सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे.
मागच्या 75 वर्षांमध्ये या देशाच्या विकासामध्ये शेतकरी कामगार युवक कष्टकरी या सर्वांचं मोठं योगदान आहे. आज 75 वर्षांच्या काळात महिला भगिनी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान देत आहेत. आजच्या या पावन दिनी या सर्वांच्या प्रति सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी कन्हैय्या उद्योग समूहाचे मच्छिंद्रशेठ लंके, सुरेश पठारे, पारनेर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती नितीन अडसूळ ,शिरूर नगरपंचायतीचे आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार ,उद्योजक अभय औटी,लिवेश नायर, कन्हैया ऍग्रोचे डॉ. अंगद रवंदळे, श्री. राजस घोगरे,इतर सर्व अधिकारी कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.