Take a fresh look at your lifestyle.

पारनेरात तिरंगा मोटारसायकल रॅली

घडले सामाजिक एकोप्याचे दर्शन !

पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
15 ऑगस्ट 2022 हे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने नगरपंचायत पारनेर व समस्त पारनेर शहरवासीयांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पारनेर तालुक्याचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे साहेब गटविकास अधिकारी किशोरजी माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर शहरात भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .
पारनेर नगर पंचायतचे नगराध्यक्ष विजय सदाशीव औटी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर , सभापती योगेश मते , डॉ. बाळासाहेब कावरे , नितीन अडसूळ , अशोकशेठ चेडे , डॉ. सचिन औटी , बाळासाहेब नगरे सुभाष शिंदे , विजय भा.औटी ,श्रीकांत चौरे भूषण शेलार , शहराध्यक्ष बंडू गायकवाड ज्येष्ठ नेते विजय डोळ यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या योगदानातून हे भव्यदिव्य नियोजन पारनेर शहरात करण्यात आले होते .
या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून सर्व गट-तट बाजूला ठेवून पारनेर शहरातील समस्त तरुण यात सामील झाले होते . त्यामुळे पारनेर शहरात सामाजिक एकोप्याचे दर्शन पुनश्च एकदा अनुभवास मिळाले .
किमान 300 तरुण ▪️ सहकाऱ्यांच्या माध्यमातून,
वंदे मातरम !
भारत माता की जय !
या घोषणांनी व फटाक्याच्या आतिषबाजीत देशभक्तीमय वातावरणात पारनेर शहर तिरंगामय झाले होते . व पारनेर शहराला एक यात्रेचे स्वरूप आले होते .दोन दिवसापूर्वी ” हर घर तिरंगा ” या मोहिमे अंतर्गत नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी घरोघर तिरंगा वाटप करून पारनेर शहरात हर घर तिरंगा ही मोहीम यशस्वी केली आहे .
थोर स्वतंत्र सेनानी सेनापती बापट यांच्या स्मारकांमधून सुरू झालेली भव्य मोटारसायकल क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळ्याला तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्यास पुष्पहार घालून ही भव्य दिव्य रॅली पारनेरच्या बाजारपेठेतून काढण्यात आली होती .या मोटार सायकल रॅली मध्ये पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक विविध पक्षातील मान्यवर मंडळी तरुण सहकारी व पारनेर शहरवासीय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .