Take a fresh look at your lifestyle.

वडगाव आमलीकरांची पिण्याच्या पाण्याची दैना फिटली !

सुजित झावरे पाटलांचा पुढाकार

पारनेर : वडगाव आमली येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे लोकार्पण झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पारनेर तालुक्यातील बाराही महिने टँकर चालू असलेले एकमेव गाव म्हणजे वडगाव आमली गेले अनेक वर्षापासून (क्षारयुक्त पाणी ) पिण्या योग्य पाणी मिळत असल्याने 10-15 किलो मिटर अंतरावरून महील्याना पाणी आणावे लागत. शुद्ध पाणी नसल्याने गावात अनेक आजार निर्माण होत. गावातील सरपंच व ग्रामस्थ यांनी दोन महिना अगोदर सुजित झावरे पाटील यांच्याची भेट घेऊन सर्व माहिती सांगितली यावेळी सुजित झावरे पाटील यांनी दोन महिन्याच्या आत सदर जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी निधी मंजूर करून रविवारी प्रकल्प सुरू केले. सदर जलशुध्दीकरण प्रकल्पाला स्व. गुलाबराव डेरे व स्व.सुनिल जाधव यांचे नाव देण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी नदीजोड प्रकल्प राबविणेसाठी निधी मिळणे बाबत मागणी केली असता जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत निधी उपलब्ध करून नदीजोड प्रकल्प लवकरच राबविण्यात येईल. तसेच दुसरा महत्वाचा प्रश्न वडगाव आमली रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खासदार सुजयदादा विखे पाटील यांचेकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त करून गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल जाहीर सत्कार केले.
यावेळी सरपंच अमोल पवार, संभाजी पवार, संदीप जाधव, नवनाथ ढोणे, व्हा. चेअरमन बाळासाहेब शिंदे, गुलाब पवार, मारूती ढोणे, दत्तात्रय पवार, बाबुराव पवार, अनिल डेरे, महादेव पवार, श्रीधर सोणुळे, अरुण जाधव मेजर, पिंटू डेरे, संभाजी औटी, सुभाष डेरे, दत्तात्रय पवार, संजय पटेकर, सनी जाधव, योगेश पवार, तानाजी शिंदे, मामा बोरुडे, नवनाथ पवार, मोहन पवार मेजर, राजू जाधव, ग्रामसेवक भुजबळ मॅडम तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
▪️ चौकट
सुजित झावरे पाटील झाले भावुक..
स्व. सुनिल जाधव तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक गुलाबराव डेरे यांची आठवण काढत सुजित झावरे पाटील भावुक झाले. गावातील विकासामध्ये या दोघांचे कार्य होते. त्यांच्या जाण्याने मला अत्यंत दुःख झाले आहे. परंतु त्यांचा कार्याला मी कायम माझ्या स्मरणात रहावे म्हणून आज जलशुध्दीकरण प्रकल्पाला स्व. गुलाबराव डेरे तसेच स्व. सुनिल पवार यांच्या स्मरणार्थ नाव देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.