Take a fresh look at your lifestyle.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

ना.राधाकृष्ण विखे महसूल मंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाकृष्ण वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
📍इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत :
  • सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ.विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  • गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
  •  दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
  • संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे – कामगार
  •  संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  •  उदय सामंत – उद्योग
  •  प्रा.तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार – कृषी
  • दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास