Take a fresh look at your lifestyle.

शिर्डीच्या साईबाबांना सोन्याची बासरी !

किंमत ऐकुन व्हाल अवाक्

शिर्डी : साईबाबांना श्रीकृष्ण स्वरूपात भजणाऱ्या दिल्लीतील एका भाविकाने साईबाबांना सोन्याची बासरी अर्पण केली आहे. १०० ग्रॅम वजनाच्या या बासरीची किंमत जवळपास पाच लाख रुपये आहे. साईबाबांच्या बद्दल ‘जशी ज्याची श्रद्धा तशी त्याला प्रचिती’ असा लाखो भाविकांचा अनुभव आहे.
जवळपास पाच लाख किंमत असलेल्या या बासरीवर सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले असून एका टोकाला सोन्याचे दोन दोर (साखळी) ही लावण्यात आली आहे. ऋषभ लोहिया यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या काही दिवस आधीच ही बहुमल्य भेट साईचरणी अर्पण केली आहे. दरवर्षी गोकुळ अष्टमीला साई मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती ठेवत जन्मोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात ही सोन्याची बासरी आकर्षण ठरणार आहे.
साईबाबा श्री कृष्णाच्या रुपात दिसतात म्हणून दिली बासरी
साईबाबांना भक्त विविध रुपात बघतात. शिर्डी हे द्वारके समान आणि साईबाबा हे कृष्णाचा अवतार समजून अनेक भक्त शिर्डीला साई दर्शनासाठी गर्दी करत असतात. दिल्लीचे रहिवासी असलेले साईभक्त ऋषभ लोहिया यांनी आज आपल्या कुटुबीयांसमवेत शिर्डीला येवून 100 ग्राम वजन असलेली सोन्याची बासरी दान म्हणून दिली आहे. शिर्डीत द्वारकामाईत साईबाबांनी आपले जीवन व्यतीत केलं. साई आम्हाला श्रीकृष्णाच्या रुपात दिसतात. त्यामुळे, श्री कृष्णाची आवडती बासरी आम्ही साईंना अर्पण केल्याचे ऋषभ लोहिया यांनी सांगितले.