Take a fresh look at your lifestyle.

लोकसभा निवडणूकीत भाजपाला बसणार धक्का ?

इंडिया टुडे, सी व्होटर्सचा सर्व्हे

मुंबई : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीला अजून दिड वर्ष अवकाश असला तरी आतापासूनच सर्व राजकिय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात भाजपची चिंता वाढवणारे निष्कर्ष समोर आले आहेत. राज्यातील जनतेला शिंदेंचे बंड आणि त्यानंतर भाजपसोबत सत्तास्थापनेचा निर्णय आवडलेला नाही असे दिसते आहे.
या सर्वेक्षणानुसार, जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर 48 जागा पैकी 30 जागा महाविकास आघाडी जिंकेल तर तर भाजप आणि मित्रपक्षांना मोठा धक्का बसेल त्यांना फक्त 18 जागांवरती विजय मिळणार. आज ज्या शिवसेनेला भाजप संपवू पाहत आहे त्यांच्यासोबत 2019च्या लोकसभा निवडणूकीत तब्बल 42 जागावर विजय मिळाला होता.
2024 मध्ये शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप महाराष्ट्रात एकहाती सत्ता घेणार असा दावा करत आहे मात्र या सर्वेच्या निष्कर्षांनी भाजपला मोठा धक्का दिला असून मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.