Take a fresh look at your lifestyle.

आमदार लंकेंनी असे साजरे केले अविस्मरणीय रक्षाबंधन !

भाऊ बहिणीच्या नात्यातील ॠणानुबंधाचा धागा असलेल्या रक्षाबंधनानिमित्त मतदारसंघातील हजारो भगिनींनी आमदार नीलेश लंके यांची भेट घेऊन त्यांना राख्या बांधल्या. माझ्यावर माया असणाऱ्या माझ्या बहिणींनी माझा दिवस अविस्मरणीय केला, या रेशमी क्षणांच्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही अशी प्रतिक्रीया आ. लंके यांनी दिली.
रक्षाबंधनाननिमित्त राळेगणसिध्दी येथे दरवर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही राळेगणसिध्दीत आ. लंके यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात रक्षाबंधन पार पडले. तेथे तालुकाभरातून जमलेल्या भगिनींनी आ. लंके यांना राखी बांधली. तर आ. लंके यांच्या हंगे येथील निवासस्थानी, पारनेर येथील संपर्क कार्यालयात येत भगिनींनी राख्या बांधल्या. संपूर्ण दिवसभरात आ. लंके हे भावूक झाल्याचे पहावयास मिळाले.
लंके म्हणाले, राखी पौर्णिमा म्हणजे भाऊ व बहिणीमधील प्रेमळ नात्याचा सण. मायेने बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक, भाऊ व बहिणीचे अतूट नाते सांगणारा हा सण आहे. या दिवसाची दरवर्षी मी आतुरतेने वाट पाहत असतो. माझ्यार प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणींना भेटून आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस. आज दिवसभरात तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या माझ्यावर माया असणा सर्व भगिनींनी आजचा दिवस अविस्मरणीय केला. या रेशमी क्षणांच्या भावना मला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाहीत. आपल्या जिव्हाळयाच्या नात्याची कायम जाण ठेवून, सचोटीने, उत्साहाने आणि आणखी जोमाने काम करण्याची उर्जा मला आज मिळाली आहे. हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहिल. हा भाउ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहिल याची ग्वाही देतो. असे आ. लंके म्हणाले.
राळेगणसिध्दी येथे पार पडलेल्या कार्यक्रमास माजी सरपंच जयसिंगभाऊ मापारी, गायकवाड सर, उपसरपंच स्नेहल फटांगडे, रामभाऊ फटांगडे, गणपतराव पठारे, गाजरे सर, सरपंच सुभाष गाजरे, रामहरी भोसले, अमोल मापारी, सागर पठारे, ज्ञानदेव पठारे, साहेबराव मापारी, प्राचार्य धावड, रामदास पोटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.