Take a fresh look at your lifestyle.

गोरेश्‍वरचे कामच भारी ; दिली अर्थकारणाला उभारी !

गोरेगांव येथे मुख्यालय असलेल्या गोरेश्‍वर पतसंस्थेने ग्रामीण भागात शाखांचे जाळे उभे करून ग्रामिण अर्थकारणास बळकटी दिल्याचे सेवा निवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर यांनी सांगितले.
गोरेश्‍वर पतसंस्थेच्या जवळे शाखेच्या पाचव्या वर्धापनदिनामित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सुपेकर हे बोलत होते. पतसस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव पानमंद, व्हाईस चेअरमन पोपटराव नांगरे, संचालक मंडळ, डॉ. सोमेश्‍वर आढाव, विजय हरेल, कानिफानाथ पठारे, भास्कर पठारे,डॉ. गागरे यांच्यासह पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सुपेकर महाराज म्हणाले, पतसंस्थेच्या माध्यमातून बाजीराव पानमंद योनी सहकारी चळवळीस बळकटी दिली आहे.सर्वसामान्य ग्राहकांना पठबळ देण्याची भुमिका घेउन त्यांचा आर्थिक स्थर उंचावण्याचे महत्वपूर्ण काम या संस्थेने केले आहे.गोरेगाव येथे सहकाराचे मंदिर उभे करून संस्थेबरोबरच सामान्यांची उन्नती साधण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ परिश्रम घेत आहे. एकीकडे बँकिंग क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झालेली असतानाही विविध सुविधा उपलब्ध करून गोरेश्‍वर पतसंस्थेने आपले वेगळेपण जपले आहे. या संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता असून पारनेर तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. यावेळी विविध क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांचा पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. जवळे परिसरातील ग्राहकांनी गेल्या पाच वर्षात मोठया प्रमाणात संस्थेस सहकार्य कले. त्यामुळेच जवळा शाखेच्या ठेवींनी नऊ कोटींचा टप्पा गाठला असून शाखेचे कामकाज प्रगतीपथावर असल्याचे पानमंद यांनी सांगितले.