Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या भगिनीने बांधली उध्दव ठाकरें राखी

शिवसेेनेच्या पारनेर तालुका महिला आघाडीच्या उपतालुकाप्रमुख, कर्जुले हर्या ग्रामपंचायतीच्या सदस्या सुनिता मुळे यांनी गुरूवारी मुंबईत मातोश्री निवासस्थानी जाउन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राखी बांधली.
मुळे या गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. यंदा रक्षाबंधनानिमित्त त्यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेनेेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राखी बांधली. यावेळी ठाकरे यांनी मुळे यांच्यासह उपस्थित भगिनींना धन्यवाद देत तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली. शिवसेना अन्यायाविरोधात नेहमीच लढा देते. त्याच ताकदीने शिवसेनेची महिला आघाडीही अन्यायाविरोधातील लढयात नेहमीच अग्रभागी असल्याचे आघाडीतील महिलांना वेळोवेळी दाखवून दिले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर दररोज मातोश्रीवर हजारो नागरीकांचे जथ्थे पाठींबा दर्शविण्यासाठी येत आहेत. शिवसेना सोडून गेलेल्यांनी जे काही कृत्य केले आहे, ते कडव्या शिवसैनिकाला, सामान्य मराठी माणसाला अजिबात रूचलेले नाही. त्यामुळेच शिवसैनिकांच्या, मराठी माणसाच्या भावना अतिशय तिव्र आहेत. कोणी स्वार्थासाठी पक्ष सोडत असेल, पक्षावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीत. महाराष्ट्रातील जनता शिवसेनेच्या पाठशी खंबिरपणे उभी आहे. बंडानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यात करीत असलेल्या दौर्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भर पावसातही मोठया सभा होत आहेत. सर्व शिवसैनिक, मराठी माणूस शिवसेनेसोबत असल्याचेच ते द्योतक आहे. आगामी निवडणूकांमध्ये त्याची प्रचिती येईलच. महिला आघाडी राज्याच्या विविध भागांतील निवडणूका तसेच मुंबई महानगरपालीकेच्या निवडणूकीत त्यांची ताकद दाखवून देईल याची मला खात्री असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेनेच्या उपनेत्या अनिता बिरजे यावेळी उपस्थित होत्या.