Take a fresh look at your lifestyle.

गुगल, अ‍ॅपल अन् ट्विटरची नावे कशी पडली?

वाचा, मनोरंजक पण सत्य माहिती !

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आपले एक वेगळेच नाते बनले आहे. गुगल, अ‍ॅपल, ट्विटरशी आपला संबंध येतच असतो. मात्र ही नावे कशी पडली? या मागच्या गमतीजमती पाहूयात.. 
याहू : या वेबसाईटचं नाव याहूज वरून घेण्यात आले आहे. याहूज हा वन्य प्राणी असून याचा अर्थ विचित्र असा आहे. बहिष्कार टाकलेला आणि गावंढळ म्हणजेच याहूज.
ट्विटर : याला आधी स्टेटस आणि नंतर ट्विटेक असं नाव दिलं जाणार होतं. ट्विटरच्या संस्थापकांनी स्टेटस हे नाव घेऊन अजून चांगल्या नावासाठी डिक्शनरीचा शोध घेतला. मित्रांशी संवाद साधत असल्याची आणि आपल्या आवाज सगळीकडे घुमत असल्याची जाणीव युजर्सना व्हावी यासाठी ट्विटर या शब्दाची निवड करण्यात आली. पक्ष्यांच्या किलबिलाटाला ट्विटर असे म्हटले जाते.
अ‍ॅपल : एका कंपनीत काम करत असताना ‘अ‍ॅपल’ चे संस्थापक स्टिव्ह जॉब्सच्या डोक्यात अ‍ॅपल हा शब्द आला आणि त्यांनी आपल्या कंपनीचं नाव अ‍ॅपल कॉम्प्युटर्स असावं असं नक्की केलं.
गुगल : गुगोल या शब्दापासून ‘गुगल’ची निर्मिती झाली. गुगोल ही एक संख्या असून यात एक आकड्यामागे 100 शून्य असतात. गुगलच्या संस्थापकांनी आधी कंपनीच नाव बॅक रब असं ठरवलं होतं. मात्र त्यानंतर गुगल हे नाव ठेवण्यात आलं.
स्काईप : याचं नाव आधी स्काय पीअर टू पीअर असं ठेवण्यात आलं होतं. हे नाव बदलून स्कायपर ठेवण्यात आलं. काही अटींमुळे शेवटचं आर हे अक्षर गळलं आणि स्काईप प्रचलित झालं.