Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांनी सहकाऱ्यासाठी शिरूरमध्ये केली ‘अशी’ प्रार्थना

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा श्रीगणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भेट देऊन शिरूर- हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पाचर्णे हे लवकरच बरे होऊन पुन्हा कार्यरत होतील, अशा सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
माजी आमदार पाचर्णे यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी हॉस्पिटल चे संचालक डॉ.अखिलेश राजुरकर व डॉ.विशाल महाजन यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रकृतीची व होणाऱ्या उपचारांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री राम शिंदे, आमदार राहुल कुल,आमदार भीमराव तापकीर,आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार सुनील कांबळे, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी मंत्री बाळा भेगडे,भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार डॉ.सुनील शेळके, दादा पाटील फराटे, संजय पाचंगे यांसह जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचर्णे यांच्या संपर्क कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, जनतेचा नेता म्हणून त्यांनी कार्यकर्त्याप्रमाणे काम केले. जनतेच्या भल्यासाठी ते नेहमीच काम करीत राहीले त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर बाबुरावजी लवकरच बरे होऊन पुन्हा कार्यरत होतील.आता आपले सरकार आले आहे. ते पूर्वीप्रमाणे पुन्हा विकास कामांसाठी माझ्या आणि चंद्रकांतदादांच्या मागे लागतील. आम्हीही त्यांच्या मागण्या पूर्ण करू.