Take a fresh look at your lifestyle.

सरपंच सौभाग्यवती लढणार ‘झेड.पी.’ निवडणूक

सोनूबाई शेवाळे उतरणार रिंगणात

नगर : प्रतिनिधी
तालुक्यातील वडगाव गुप्ताचे लोकनियुक्त सरपंच विजयराव शेवाळे यांच्या सौभाग्यवती सोनूबाई शेवाळे रिंगणात जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतारणार आहेत.
वडगाव गुप्ता गट हा महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.या गटामधून वडगाव गुप्ताचे सरपंच विजयराव शेवाळे यांच्या पत्नी सोनूबाई शेवाळे वडगाव गुप्ता गटामधून निवडणुकीत उतरणार आहे. या गटातील गावे पिंजून काढली आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. निवडणुकीची जोरदार तयारी चालू केली आहे.
सरपंच विजयराव शेवाळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा चेहरा मोहरा बदलून विकासाची गंगा गावात आणली. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधली. या बंधाऱ्यामुळे या परीसरातील हजारो एकर शेती पाण्याखाली आली. सर्व क्षेत्र बागायतदार केले. शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला, स्मशानभूमी मध्ये गरम पाण्याची सोय केली , महिला ना कपडे धुण्यासाठी धोबी घाट तयार केला या धोबीघाटवर गावातील महिला कपडे धुण्यासाठी जातात.
पिंपळगाव माळवी, नवनागापूर, वडगाव गुप्ता, नागापूर या गावासाठी अंत्यविधीसाठी मोक्षरथाची सोय केली. स्मशानभूमी गावापासून लांब असल्यामुळे हि सोय शेवाळे यांनी केली. गावामध्ये लोकवर्गणीतून मंदिरे उभारण्यासाठी पुढाकार घेतला तसेच गावामध्ये तीन हजार झाडे लावली. शेवाळे यांचा या गटामध्ये जनसंपर्क , नातेवाईक मित्र परिवार मोठया प्रमाणात असल्यामुळे या गटातून सौभाग्यवती सोनूबाई शेवाळे उमेदवारी करणार असल्याचे सांगीतले जाते.