Take a fresh look at your lifestyle.

प्रवीण दरेकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल !

'ते' वादग्रस्त वक्तव्य नडले !

 

पुणे : शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळाव्यादरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर आपल्या ट्विटर अकाऊंटवर रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये रुपाली चाकणकर म्हणाल्या, “प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी… कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात गुन्हा दाखल केला आहे”.
प्रवीण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी.
शिरूर येथे 13 सप्टेंबर रोजी रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. लावणी कलाकार सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावर भाष्य करताना प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. या प्रवेशावर नाव न घेता, ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे’ अशी टिपण्णी दरेकरांनी केली होती. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे, असल्याचा आरोप दरेकर यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यानंतर काल (बुधवार) प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.