Take a fresh look at your lifestyle.

धोत्रे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

धोत्रे खु॥ : प्रतिनिधी
आण्णाभाऊ साठे यांचे विचार लेखण समाजातील घराघरात पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते अमोल साळवे यांनी केले.
धोत्रे बु ॥ वि.का. सेवा सह. सोसायटीचे संचालक श्री.रभाजी भांड सर यांनी थोर समाजसुधारक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कथा, कादंबऱ्या, शाहिरी पोवाडे, नाटके लिखाणातून कष्टकरी जनतेत विचाराची बीजे पेरण्यासाठी त्याचा प्रचार व प्रसार केला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना लोकशाहीर ती पदवी दिली त्यांची जयंती संपूर्ण मांग समाजात नव्हे तर सर्व तळागाळातील जातीत देखील त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत सदस्य
श्री.जालिंदर भांड यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची विचार तरुण पिढीने पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी मा.चेअरमन व विद्यमान संचालक श्री.भाऊसाहेब भांड व मा.व्हा. चेअरमन भाऊसाहेब कुटे निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य श्री.विजय सासवडे मेजर,श्री. बाबासाहेब भांड सर, श्री.बाळासाहेब भांड, श्री.अशोक आल्हाट, श्री.शिवाजी आल्हाट, तसेच प्रविण आल्हाट,किरण आल्हाट, बंटी फाटक, प्रदीप आल्हाट, विशाल रोकडे, शिवाजी रोकडे व महिला सह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बाळासाहेब भांड यांनी केले व आभार श्री. बाबासाहेब आल्हाट यांनी मानले.