Take a fresh look at your lifestyle.

प्रती पंढरपूर पळशीत भक्तीरसाला उधाणं !

सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते महापूजा

पळशी : प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री.क्षेत्र पळशी येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तीरसाला उधाण आले होते. श्री विठ्ठल राही रुख्मिणी मंदिरामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे हस्ते महाआरती व पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी सुजित झावरे पाटील यांनी श्री विठूरायाकडे सर्वांना सुख, समाधान, शांती लाभो, यावर्षी पाऊस चांगल पडावा, माझ्या शेतकरी राजाला चांगले दिवस येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना केली.

माजी सरपंच मिठूशेठ शिंदे मंदिराचे प्रमुख आण्णा काका पोळ, पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, महेश पाटील ढुस, सरपंच सुमनताई सैद, भाऊसाहेब सैद, दिलीपराव पाटोळे, बा. ठ. झावरे, भागूजी दादा झावरे, मधुकर बर्वे सर, मा.सरपंच संतोष जाधव, मोढवे सर, भास्कर शिंदे, दिपक गुंजाळ, ऋषिकेश गागरे, शिवाजी शिंगोटे, बन्सी गागरे, बापू काळणर, महादू पठारे, भाऊ पाटील गागरे , विकास गांधी, संतोष सुडके, रवी शिंदे भूषण मोढवे, भाऊसाहेब मोढवे, कारभारी शिंदे, उमा हरी मोढवे तसेच तालुक्यातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सभामंडप, भक्त निवास, पेव्हींग ब्लॉक बसविणे, तसेच परिसर सुशोभीकरण करणे इ. विकास कामासाठी आतापर्यंत ७५.००लक्ष रु. विकास कामे करण्यात आली आहे. यापुढे ही सदर मंदिरासाठी निधी देणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.