Take a fresh look at your lifestyle.

निम्म्या महाराष्ट्राचाच आज ‘सरकारी’ वाढदिवस !

पारनेरचे 'हे 'आहेत बर्थ डे बॉय !

पारनेर : प्रत्येकाच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर १ जुन रोजी वाढदिवस असलेली शेकडोंची फ्रेंडलिस्ट आहे. त्यामुळे बहुतांश लोक सामूहिकरीत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. या वाढदिवसाला अनेकांनी तर गमतीने शैक्षणिक किंवा सरकारी वाढदिवस म्हणून संबोधले आहे. यामुळेच जवळपास निम्म्या महाराष्ट्राचाच आज वाढदिवस आहे.
१९८० च्या आधी जन्माला आलेल्या अनेकांची जन्म तारीख म्हणून शाळेच्या दाखल्यावर १ जूनची नोंद आहे. ज्यांचे जन्मदाखले उपलब्ध नव्हते, अशांची शाळेमध्ये १ जून ही जन्मतारीख नोंदवली गेली आहे. त्यामुळे या वाढदिवसाला सरकारी वाढदिवस असेही संबोधले जाते. अशा सरकारी वाढदिवसानिमित्त सोशल साइटवर शुभेच्छांचा वर्षाव होताना आज दिसून येत आहे. १ जून ही जन्मतारीख असलेल्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे दिवसभर सोशल मीडियावर वाढदिवस शुभेच्छांच्या व्यतिरिक्त फारसे काही अपलोड झालेले पाहायला मिळणार नाही.
आज कोणाचा वाढदिवस आहे, हे सोशल मीडियातून तत्काळ समजत असल्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे फॅड सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे अॅण्ड्रॉइड मोबाइलमध्ये असणाऱ्या अॅप्सचा वापर करून वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचा फोटो अॅड करून किंवा वेगवेगळे कोलाज बनवून शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजकारणी लोकांच्या वाढदिवसाचे बॅनर कार्यकर्ते शहरभर लावतात. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल, तर कोणी बॅनर लावत नाही व कोणी त्याला शुभेच्छाही देत नाही. मात्र, सोशल मीडियावर अकाऊंट असणाऱ्या सर्व सामान्यांवर देखील वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा वर्षाव झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळे आपला देखील वाढदिवस साजरा केला जातो असा आनंद त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. त्यामुळेच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. १ जून जन्म तारीख असली तर ती खोटी असेल म्हणून त्याच्याकडे संशयाने पहिले जाते.
▪️ निरक्षरतेचा परिणाम
१९८० च्या आधी निरक्षरता जास्त होती. त्यावेळी बहुतांश पालकांना आपल्या पाल्याची जन्मतारीख माहीत नसायची. मात्र साल माहित असायचे. गुरुजींनी शाळा प्रवेशाच्या वेळी संबंधित पालकांना पाल्याची जन्मतारीख विचारल्यावर मात्र हे पालक गोंधळायचे. निदान वर्ष माहित आहे का असे विचारल्यावर पालक वर्ष सांगत असत. मग त्याच वेळी गुरुजी आपल्या सोयी नुसार १ जून ही जन्म तारीख निश्चित करायचे. अशा पद्धतीने अनेकांच्या जन्मतारखांचा जन्म झालेला आहे. १९८० नंतर मात्र साक्षरता वाढत गेली आणि पालक जागरूक झाल्याने पाल्याची जन्मतारीख लिहून ठेवू लागले.
▪️ पारनेरचे आजचे ‘बर्थ डे’ बॉय.
बाबासाहेब तांबे, सुरेशशेठ धुरपते,मार्तंडराव बुचुडे, रामदास भोसले, वसंतराव चेडे, दत्ताशेठ कुलट, बबनराव गायके, डॉ.राजेंद्र सांगळे, उदय शेरकर, बाळासाहेब नरसाळे ,अनिल चौधरी, प्रमोद गोळे, किसन गंधाडे,संतोषराव गायकवाड, सुरेश बोऱ्हूडे,कैलास लोंढे, शिवाजी चेडे ,दत्ताशेट अंबुले,शिवाजी बेलोटे, शिवाजी औटी, बाजीराव पानमंद,अण्णा औटी, अरूण ठाणगे, शिवाजी वराळ,सोमनाथ वाकचौरे, गोवींद रेपाळे,संभाजी शिवाजी औटी, साहेबराव रेपाळे, राजू म्हस्के,सलिम राजे, दत्ता रेपाळे,पोपट फटांगडे, पांडुरंग भालेकर, तुकाराम मापारी, संतोष खणकर, संभाजी झावरे, नवनाथ नरसाळे, संतोष मोढवे, देवदत्त साळवे, अजीत चत्तर,मारूती शेरकर, दादाभाऊ नगरे, शरद नगरे,अंबादास तांबे, सुनील चव्हाण,अप्पासाहेब नरवडे, विठ्ठल शेळके, रघुनाथ वाळुंज, संजय पठारे, रामराव गाडेकर,संपतराव उगले, भास्कर पठारे, बाळू औटी, रामदास उचाळे, विकास देशमुख, प्रमोद शेलार, बाळासाहेब चेमटे,दिलीप खोडाळ,भाऊसाहेब गायखे, संतोष रांधवण, दादाभाऊ बोरूडे, रमेश नवले, महेश कड, विठ्ठल औटी, भाऊसाहेब कोरडे,ज्ञानदेव भिसे, सखाराम औटी, भाऊसाहेब काळे, रामदास पिसे, एस.बी. खामकर, शिवाजी भालेकर, विशाल सोनवणे, दत्तात्रेय भोर, पोपट अडसुळ,तात्याभाऊ शेरकर, जालींदर शिंदे, युवराज जगताप,शंकर बर्वे, उत्तम नरसाळे, मच्छींद्र नगरे, शिवाजी सरडे, दिलीप कळसकर, मंगेश काळे, सुभाष राशिनकर,विशाल भिसे, सोपान तांबे, अंबर पवार, रावसाहेब झावरे, विष्णू रासकर
सर्वांना ‘पारनेर दर्शन‘ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दै.पारनेर दर्शन

आता मिळवा रोजचा पेपर 🗞️
आपल्या WhatsApp वर 📲
WhatsApp Group Link