Take a fresh look at your lifestyle.

सावधान …आमचे तुमच्यावर लक्ष आहे !

माठ गावावर १४ सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची नजर

 

श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील माठ ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात सुरक्षिततेच्या दृष्टीने १४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आता सावधान … आमचे तुमच्यावर लक्ष आहे म्हणत नजर ठेवली जाणार आहे .
बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या हस्ते नुकतेच सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच सविता घेगडे, उपसरपंच अनिल घेगडे, रेवजी घेगडे, भास्कर घेगडे, उमेश घेगडे, आप्पा खेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
माठ गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरु आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भैरवनाथ यात्रोत्सवात वादविवाद होऊ नयेत तसेच बाहेरून कुणी येऊन दहशत वा दंगल करू नये यासाठी तसेच यापुढेही कायमच सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावात ७५ हजार रुपये खर्च करून १४ कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतच्या वतीने सावधान …आमचे तुमच्यावर लक्ष आहे म्हणत गावात कुणाचाही प्रवेश होताना कॅमेर्‍यात कैद होणार आहे.
यावेळी प्रविण खेडकर, बाळासाहेब देविकर, विलास घेगडे, संभाजी घेगडे, सुधाकर पवार, कानिफनाथ ढगे, अण्णासाहेब घेगडे, दशरथ पंदरकर, बबन जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक संदिप लगड यांनी आभार मानले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हे कमी होण्यास मदत होऊन आपले गाव चोरी व इतर संकटापासून सुरक्षित राहते. माठ ग्रामस्थांनी सी.सी.टी.व्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय हा चांगला निर्णय असून प्रत्येक ग्रामपंचायतीने गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे.
श्री.नंदकुमार दुधाळ
पोलीस निरीक्षक बेलवंडी पोलीस स्टेशन
फोटो – माठ ( ता. श्रीगोंदा ) येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करताना बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ
( छाया – दीपक नि. वाघमारे, देवदैठण )