Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸22 एप्रिल 2022

0

 

▪️मेष : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल.
▪️वृषभ : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कमिशन मधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे.
▪️मिथुन : चुकीच्या संगतीत अडकू नका. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका.
▪️कर्क : हातातील कामात यश येईल. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. विरोधकांचा रोष मावळेल.
▪️सिंह : अपचनाचा त्रास जाणवेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
▪️कन्या : अती अपेक्षा बाळगू नका. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील.
▪️तूळ : मुलांचे विचार समजून घ्यावेत. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल. मनातील अकारण भीती दूर सारावी.
▪️वृश्चिक : हातातील कामे सुरळीत पार पडतील. भडक शब्दांचा वापर करू नये. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा.
▪️धनू : चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका. पित्त विकार वधू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे.
▪️मकर : नातेवाईकांशी समझोता करावा लागेल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे.
▪️कुंभ : कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल.
▪️मीन : कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका.
Leave A Reply

Your email address will not be published.